Skip to main content

Posts

नीतिमान युवकांना स्वामींचे स्फूर्तिदायी , दुमदुमणाऱ्या शब्दांत आवाहन-

      " हे नरनारींनो , तुमच्यामधे जर अशी पवित्र , अनाघ्रात पुष्पे असतील तर ती भगवंताच्या पादपद्मी वाहणे उचित होईल . जर तुमच्यामधे अशा व्यक्ती असतील की ज्यांची संसारात प्रवेश करण्याची इच्छा नाही , ज्यांचे वय फार झालेले नाही तर त्या त्याग करोत. आध्यात्मिकतेच्या प्राप्तीचे हेच रहस्य आहे - त्याग करा . भय कसले ? साहस अवलंबून त्याग करा बघू . असला प्रबल त्याग आवश्यक आहे .       " तुम्हाला दिसत नाही काय की पाश्चिमात्य देशांत जडवादाचा कोण प्रबल स्रोत वाहतो आहे ? काम आणि अपवित्रता समाजाची हाडेदेखील पोखरीत आहेत , हे तुम्हाला दिसत नाही काय ? ह्या प्रकाराला तुम्ही केवळ शब्दांच्या द्वारा अथवा समाजसुधारणेच्या द्वारा कदापि पायबंद घालू शकणार नाही . सभोवार चाललेल्या क्षय - विनाशामधे धर्माच्या भरभक्कम अचल पायावर उभे राहून त्यागाच्या शक्तीनेच ह्या प्रकारास आळा घालणे शक्य आहे . वायफळ तोंडपाटीलकीत काय हशील ? आपल्या रोमारोमातून पवित्रतेची शक्ती , ब्रह्मचर्याची शक्ती त्यागाची शक्ती प्रकट होऊ द्या . जे रात्रंदिवस कांचनासाठी धडपडत असतात . त्यांच्यावर ही शक्ती जाऊन आघात करो ....
Recent posts

भगवान बुद्ध

                                                                           भगवान बुद्ध ( अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील डेट्रॉइट नामक शहरी एकदा व्याख्यान देताना स्वामी विवेकानंदांनी भगवान बुद्धदेवांसंबंधी पुढील विचार प्रकट केले होते )      प्रत्येक धर्माने एकेका विशिष्ट साधनावर भर देऊन त्याचाच विशेष विकास केला असल्याचे आपल्याला आढळून येईल . बौद्ध धर्मामधे निष्काम कर्माला प्राधान्य मिळाले आहे . तुम्ही लोक बौद्धधर्म आणि ब्राह्मणीधर्म यात घोटाळा करून नका . या तुमच्या देशात अनेक व्यक्ती असला घोटाळा करताना आढळतात . ह्या लोकांची अशी समजूत आहे की , बौद्धधर्माचा सनातनधर्माशी काहीही संबंध नसून तो एक संपूर्ण स्वतंत्र धर्म आहे . परंतु ही त्यांची गैरसमजूत आहे , वस्तुस्थिती अशी नाही . वस्तुत : बौद्धधर्म हा सनातन धर्माचाच केवळ एक विशिष्ट संप्रदाय आहे . हा बौद्धधर्म गौतम नामक एका महापुरु...
" धर्मसाधनेमध्ये अग्रसर झाल्यावर शेकडा ऐंशी माणसे ठग होऊन जातात आणि सुमारे पंधरा माणसे पागल बनून जातात . उरलेली फक्त शेकडा पाचच माणसे पूर्ण सत्याच्या साक्षात्काराने धन्य होत असतात ."
" ह्या चुकांची , अपयशांची तमा बाळगू नका ; . . . क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका . हजार वेळा आपल्या आदर्शाला धरून राहण्याचा प्रयत्न करा . आणि हजारही वेळा अपेशी झालात तरी फिरून एकदा कंबर बांधून प्रयत्न करा . . . . आत्म्यासमोर अनंत आयुष्य पडलेले आहे . तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या आणि तुम्हाला तुमचे ईप्सित प्राप्त होईलच . "